Skip to content
  • Home
  • About Us
  • Influencers
  • Lifestyle
  • Biography
  • Film Industry
  • Entrepreneurs
  • Masters
  • Achievement
  • Sports
  • Current Affairs
Facebook Instagram
  • Home
  • About Us
  • Influencers
  • Lifestyle
  • Biography
  • Film Industry
  • Entrepreneurs
  • Masters
  • Achievement
  • Sports
  • Current Affairs
Home BUSINESS

गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत पुण्यात विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026

theinfluencersofindia theinfluencersofindia by theinfluencersofindia theinfluencersofindia
September 2, 2026
in BUSINESS
3k 30
गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत

गुणांपेक्षा विद्यार्थ्यांची जिद्द आणि ध्येय अधिक महत्त्वाचे

कृष्णकुमार गोयल आणि योगेश देशपांडे यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे : दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शेवट नसून पुढील प्रवासाची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, उच्च शिक्षण घ्यावे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीबरोबर समाजाच्या कल्याणासाठी करावा, असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थी गुणगौरव समारंभात देण्यात आला.

क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानतर्फे आयोजित ३६ वा “हिंदू मागासवर्गीय विद्यार्थी गुणगौरव समारंभ” रविवार, ३० ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला.

कार्यक्रमाला कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल आणि देशपांडे लँडमार्कचे व्यवस्थापकीय संचालक तथा सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनचे संस्थापक-संचालक योगेश देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात इयत्ता दहावीमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना “क्रांतिवीर लहुजी वस्ताद पुरस्कार” आणि “पूजनीय श्रीगोलवलकर गुरुजी पुरस्कार” प्रदान करण्यात आला. सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनतर्फे श्री. अरुण कुलकर्णी यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या ५५ विद्यार्थ्यांना “सुदर्शन विद्यार्थी प्रेरणा पुरस्कार–२०२६” देऊन गौरविण्यात आले.

स्वयंसेवक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी सुरू केलेले सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन आरोग्य, कर्करोगविषयक जनजागृती, शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रांत कार्यरत आहे. “स्वतःसाठी थोडे आणि समाजासाठी सर्वस्व” या भावनेतून विद्यार्थ्यांना शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गुण कमी अथवा जास्त असले तरी एका परीक्षेचा निकाल विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्याला अनेक संधी उपलब्ध होणार असून सातत्य, जिद्द आणि प्रामाणिक परिश्रमांच्या बळावर मोठे यश मिळवता येते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद रामाकांत एकबोटे यांच्या समाजाभिमुख कार्याचे आणि विद्यार्थी प्रोत्साहन उपक्रमातील सातत्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

छायाचित्र ओळ: गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत, सुदर्शनचे श्री. अरुण कुलकर्णी, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल, देशपांडे लँडमार्कचे व्यवस्थापकीय संचालक तथा सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनचे संस्थापक-संचालक योगेश देशपांडे, मिलिंद रामाकांत एकबोटे आणि मान्यवर.

Tags: गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत
Share1201Tweet751
Previous Post

ET Media: Procurement Leadership Summit 2026 Bengaluru

Next Post

Gunesh Bharathiya Gifts Website to Shivanjali Nrityalaya

theinfluencersofindia theinfluencersofindia

theinfluencersofindia theinfluencersofindia

Next Post
Gunesh Bharathiya

Gunesh Bharathiya Gifts Website to Shivanjali Nrityalaya

Quick Links

Home

About Us

Contact Us

Work with Us

Advertise with Us

More Links

Disclaimer

Privacy Policy

Refund Policy

Terms & Conditions

Facebook Instagram Icon-email